डोळ्याखालील वर्तुळ घालवण्यासाठी 7 आश्चर्य कारक टिप्स
मध्यम वयात असणार्या आपण सर्व जणी म्हणजेच माझे लेडी डॉट कॉम कुटुंब
आपण गृहीणी आहात का ?आपण उद्योजिका आहात,नोकरी- घर सर्व सांभाळणारी एक कर्तुत्ववान स्त्री आहात का? संसार मुलं नोकरी ह्या सर्व व्यापात आपणास स्वतःकडे पाहण्यास वेळ नाही का ?
अशातच आपले प्रतिबिंब आरशात पाहताना वाईट वाटते, असे आहे का ?
डोळ्याखालील वर्तुळे, सुरकुत्या यामुळे तुमचं वय जास्त आहे, असं दिसून येत आहे का??
हा बदल का?
तुम्हाला चिंता वाटते का या काळ्या वर्तुळांमुळे तुमच्या चेहऱ्याचा तेजस्वीपणा कमी झालाय??
या काळ्या वर्तुळांमुळे लोक तुम्हांला कायम विचारतात, ''का ग, झोप नीट लागत नाही का? कुठली चिंता आहे का??''
अशा प्रश्नांना तुम्हाला रोज सामोरं जावं लागतं का?
यातल्या एका जरी प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर नक्कीच शेवटपर्यंत वाचा. यातल्या 7 आश्चर्यकारक टिप्स चा जर तुम्ही अवलंब केलात तर काळी वर्तुळं नक्कीच नाहीशी होतील.
नमस्कार, मी डॉ. स्मिता चाकोते. सौंदर्य व त्वचा रोग तज्ञ. येत्या 3 वर्षात मला 100000 मध्यमवयीन स्त्रियांना सुंदर बनवायचे आहे. 'मिशन ब्युटी, सुंदर मी होणारच' या सिरीजद्वारे.
या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला काळी वर्तुळं घालवण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ते सांगणार आहे, चला तर मग जाणून घेऊया, काय आहेत त्या आश्चर्यकारक टिप्स. या टिप्स करायला अतिशय सोप्या अशा या टिप्स आहेत.
1.झोपेची ठराविक वेळ ठरवा -
झोपताना खूप शांत मनाने झोपा. जास्त प्रकाश देणाऱ्या दिव्या ऐवजी, मंद प्रकाश देणारा दिवा लावा. ज्या बेड वर तुम्हीं झोपता ती स्वच्छ, मऊ, सुती अशी बेडशीट वापरा. आरामदायी कपडे घाला आणि आरामदायी पद्धतीने झोपा.झोपायच्या किमान अर्धा तास अगोदर, TV, मोबाईल, कॉम्पुटर वापरू नका.झोपायच्या अर्धा तास अगोदर ध्यान करा, जप करा, एखादं छान पुस्तक वाचा. आवडतं सौम्य म्युझिक ऐका.
2.झोपायच्या किमान अर्धा तास अगोदर, TV, मोबाईल, कॉम्पुटर वापरू नका -
4.पोषक आहार घ्या -
आपण आपल्या आहाराकडे फारसं लक्ष देत नाही, पण तसं न करता योग्य आणि सकस आहार घ्या. Iron, VitK, Folic Acid, VitE, B-complex, Carotene हे सर्व घटक असलेला आहार घ्या. खजूर, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, काकडी, गाजर, कलिंगड, टोमॅटो यांचा रोजच्या आहारात समावेश करा.
5.ब्रेक घ्या -
तुम्ही दिवसभर कामात व्यस्त रहात असाल तर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा डोळे मिटून शांत बसा. थकवा येईल तेव्हा डोळ्यांना हलक्या बोटांनी मसाज करा किंव्हा दोन्ही हातांचे तळवे दोन्ही डोळ्यांवर 1मिनिटभर ठेवा, असं केल्याने तुम्हाला खूप आराम मिळेल. छान हिरव्या बागेची कल्पना करा किंव्हा खरोखरच बागेत फिरायला जा, तेथील बहुरंगी सौंदर्य तुमच्या डोळ्यांना चैतन्य देईल.
6.ऍलर्जी आहे का ?
डॉक्टरांच्या सल्ल्याने Night cream किंव्हा बदाम तेल यांनी डोळ्यांना हलक्या बोटांनी मसाज करा. डोळ्यांवर काकडीच्या चकत्या ठेवा, किंव्हा कोरफडच्या गराचा ही वापर करू शकता.
मैत्रिणींनो, या होत्या त्या आश्चर्यकारक अशा 7 टिप्स, ज्यांचा अवलंब करून तुम्हीं तुमचं हरवलेलं सौंदर्य आणि आत्मविश्वास परत मिळवू शकता. तुम्हीं या टिप्स फॉलो केल्या तर मी खात्रीपूर्वक सांगते, तुम्ही काळी वर्तुळं आणि सुरकुत्या यांपासून मुक्ती मिळवाल. स्वतःला आरशात पाहून कायम म्हणा, 'मी सुंदर आहेच'.
मैत्रिणींनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेयर जरूर करा. तुमच्या एका शेअरिंग ने कदाचित एखादीच आयुष्य ही बदलू शकत. पुन्हा भेटू अशाच एका समस्येवर उपाय घेवून.
मी डॉक्टर स्मिता चाकोते, आपलीच सौंदर्य व त्वचारोग तज्ञ. Expert For Ageless Beauty
माझा संकल्प आहे की ,पुढील तीन वर्षात मला 1 लाख मध्यमवयीन स्त्रियांना सुंदर , चिरतरुण बनवायचे आहे.
आपणास वरील ब्लॉग आवडल्यास नक्कीच आपण व आपले आप्त व मैत्रिणी खाली दिलेल्या फेसबुक लिंक वर क्लिक करून या मिशन चा एक भाग होऊ शकता.
चला तर मग या लिंक वर क्लिक करा आणि
Mission Beauty सुंदर मी होणारच, या आपल्या समुदायात सहभागी व्हा.
https://www.facebook.com/groups/994946850922196
https://www.facebook.com/Dr.SmitaChakote
मस्तच डॉक्टर. मी आजपासूनच हे सगळं करायला सुरुवात करते.
ReplyDeleteखूप छान ब्लॉग आहे सर्वांच्या आयुष्यात उपयोगी अशा टिप्स धन्यवाद मॅडम 👍🙏🙏💐💐
ReplyDeleteखूप छान mam माहितीपूर्ण लेख आहे
ReplyDeleteExcellent Dr.
ReplyDeleteफारच उपयोगी टिप्स् मिळाल्या धन्यवाद मँडम...!
ReplyDeleteVery useful information Dr🙏🙏
ReplyDeleteKhupach chhan Information
ReplyDeleteKhup Chan mahiti Dr.you are great.....
ReplyDeleteThank you very useful tips
ReplyDelete