चिरतरुण सौंदर्यासाठी ७ जादुई उपाय
चिरतरुण सौंदर्यासाठी ७ जादुई उपाय मध्यम वयात असणार्या आपण सर्व जणी म्हणजेच माझे लेडी डॉट कॉम कुटुंब आपण गृहीणी आहात का ?आपण उद्योजिका आहात,नोकरी- घर सर्व सांभाळणारी एक कर्तुत्ववान स्त्री आहात का? संसार मुलं नोकरी ह्या सर्व व्यापात आपणास स्वतःकडे पाहण्यास वेळ नाही का ? अशातच आपले प्रतिबिंब आरशात पाहताना वाईट वाटते, असे आहे का ? चेहऱ्यावर वांग, टेन, पिग्मेंटेशन डोळ्याखालील वर्तुळे, सुरकुत्या ह्या सर्व आरशात पाहताना दिसत आहेत का ? हा बदल का? असे असेल तर "मिशन ब्युटी सुंदर मी होणारच" च्या या ७ जादुई उपाय खास तुमच्यासाठीच. आपण सर्व प्रदूषणात जगतोय .कामानिमित्त आपल्याला उन्हात बाहेर जावे लागते .आयुष्यात ताण तणाव वाढला आहे आणि हॉर्मोन्स बदल हेसुद्धा आपल्या आयुष्यात खूप मूड चेंज घडवून आणत आहेत .शांत झोप येत नाही ही सर्व कारणं तुमची माझी कथा सांगतात, हो ना!!! मी डॉक्टर स्मिता चाकोते आपणास ७ जादुई उपाय सांगणार आहे जेणेकरून आपण सदैव आपले तारुण्य टिकवून ठेवणार आहात, चिरतरूण दिसणार आहात. मी स्वतः गेल्या 13 वर्षापासून ह्या कृती करत आहे आणि त्याने माझ्यासाठी चमत्कार केले आहेत. मी स्